सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बलात्कार करून एक लाख पंचवीस हजार रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी एका ३६ वर्षीय महिनेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
महेश नवनाथ दंडवते रा. आनंदनगर निंबुत ता. बारामती असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आक्टोंबर २०२० पासुन ते दि. ऑक्टोबर २०२३ च्या दरम्यान महेश नवनाथ दंडवते रा. आनंदनगर निंबुत ता. बारामती जि.पुणे यास १७ हजर रुपये उसने पैसे दिले होते. पीडितेने सदरच्या पैशाची मागणी केल्यावर महेश दंडवते याने पीडितेस पैसे देण्यास टाळाटाळ करुन तुझे बाहेर लफडे असलेबाबत मी तुझे नवऱ्याला सांगेन तुझे आणी माझे अनैतीक संबंध असलेबाबत मी तुझे नवऱ्याला सांगतो.
असे म्हणुन पीडितेस मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन तसेच ब्लॅकमेल करून त्याने व त्याची आई आशा नवनाथ दंडवते यांनी पीडित महिलेकडून वेळोवेळी १ लाख २५ हजार रुपये घेवुन तसेच त्यांनी पीडित महिलेला निंबुत ता. बारामती जि.पुणे येथील उस पिकाचे शेतात नेवुन तेथे महेश दंडवते याने पीडितेच्या अंगावरील सर्व कपडे काढणेस भाग पाडुन त्याने त्याचे मोबाईल हॅन्डसेटमध्ये पीडितेचा सेल्फी फोटो तसेच नग्न फोटो काढुन त्याने पीडीतेला वेळोवेळी ब्लॅकमेल करून महेश नवनाथ दंडवते याने येथील उस पिकाचे शेतात वेळोवेळी पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरंसबध करुन त्याने त्याचे छातीवर गोंदलेले माझे नाव पीडितेच्या मुलांना, तसेच पतीला व इतरांना दाखविणेची वेळोवेळी धमकी देवुन ब्लॅकमेल करून तसेच महेश दंडवते याने त्याचेकडील असलेले पीडित महिलेचे बोलणे केलेले रेकॉर्डींग पीडितेच्या पतीला ऐकवून ५० हजार रुपयांची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करत आहेत.
COMMENTS