पुरंदर ! विजय लकडे ! निरेच्या भर बाजारपेठेत मोटरसायकल चोरांचा धुडगूस : दहा दिवसात तब्बल पाच मोटारसायकलवर डल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
नीरा : विजय लकडे
नीरा ता. पुरंदर येथून भर बाजारपेठेतील मागील दहा दिवसात चोरट्यांनी पाच मोटरसायकलवर डल्ला मारत त्या लंपास केल्या आहेत.   
     पुरंदर तालुक्यात एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निरेमध्ये मागील दहा दिवसात काही दिवसाच्या अंतराने तब्बल पाच मोटरसायकल वर चोरट्यांनी डल्ला मारलेला दिसत आहे.  
यामध्ये भिवा वळकुदे यांची बजाज कंपनीची डिस्कवर क्र MH 12 MN 0764. ही मोटरसायकल राधाकृष्ण मंगल कार्यालय येथून पहाटेच्या सुमारास चोरीला गेली आहे. अशाच काही मोटरसायकली मागील दहा दिवसात यामध्ये प्रकाश बेसके यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्र MH 12 FG 6718   कुलदीप पवार यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्र MH 12 FU 9291  अमर घुले यांची होंडा कंपनीची फॅशन क्रMH 12 HP 5600 व मागील महिन्यात विशाल कड यांचीMH 11 6333 क्रमांकाची स्प्लेंडर गाडी निरा बाजारपेठेतून सोरीस गेली आहे.  
      वास्तविक तालुक्यात एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निरेमध्ये संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची ग्रामस्थांची मागणी होती. दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात देखील मोबाईल चोरी पाकीटमारी व  मंगळसूत्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नीरेमध्ये परप्रांतीयांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आपणास पहावयास मिळतो रोजगाराच्या शोधात नीरेमध्ये आलेले परप्रांतीय खरेच रोजगारासाठी आले आहेत का? याची शहनिशा झाली आहे का?  ‌ व ते ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहतात तेथील घर मालकांनी याची पोलीस दप्तरी नोंद केली आहे का हे प्रश्न अनुत्तरीत राहतात.   
         हा सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
To Top