सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा यांचा 20 पेक्षा पट कमी असल्यास त्या बंद करून त्या ठिकाणी समूह शाळा काढणार असल्याचा नुकताच शासनाने अध्यादेश काढलेला आहे या काढलेल्या आदेशाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने निषेध करून सदर बाब गंभीर स्वरूपाची असून याचा परिणाम शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेवर होणार आहे तसेच जास्तीत जास्त परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार आहे कारण समूह शाळा ज्या विभागात काढणार ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे सदरची योजना अजिबात बरोबर नाही ही समाजाला घातक असून बहुजन समाजाला शिक्षणापासून पुन्हा वंचित ठेवण्याचे षडयंत्र या सरकारने केले आहे, त्याला तीव्र विरोध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावळी तालुक्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू यांच्या आदेशावरून मा तहसीलदार जावली यांना निवेदन देण्यात आले या वेळी रि .पा .ई. आठवले गटाचे पाश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ संपतराव कांबळे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, तालुका कार्याध्यक्ष सुशांत कांबळे, मा वसंतराव चव्हाण, अनिल शिंदे, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS