सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ / प्रतिनिधी
गत हंगामात तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावे अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटेनेच्या वतीने तर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने प्रतिटन पाचशे रुपये व नफ्यातील रक्कम कारखान्याने द्यावी अशी मागणी सोमवारी करण्यात आली .
दरम्यान , दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्याशी दोन्ही संघटना पदाधिकार्यांनी चर्चा करून मागणीवर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली
सोमवारी स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकर्यांच्या वतीने श्री दत्त कारखाना व्यवस्थापनास ढोल वाजवत निवेदन देण्यात आले . तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ऊस दर मागणीसाठी
दत्त कारखाना प्रवेशद्वारात काही काळ ठिय्या मारून लक्ष वेधून घेतले
दरम्यान दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर येऊन या मागणी संदर्भात माहिती घेतली. कारखान्याचे व्यवस्थापनाने नेहमीच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले आहेत .शेतकरी सभासदांच्या मागणीनुसारच कारखान्याचा वाढता विस्तार व कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू असून कारखाना व्यवस्थापन पारदर्शक व आदर्शवत काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी हिताबाबत व्यवस्थापन निर्णय घेईल असे सांगून चेअरमन पाटील यांनी आंदोलकांनी समजून घ्यावे असे चेअरमन पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम . व्ही . पाटील , संचालक दरगु गावडे, शेखर पाटील, धनाजीराव पाटील - नरदेकर . सावकार मादनाईक, सागर शंभुशेट्टी, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे , प्रकाश गावडे , रावसाहेब पाटील , विश्वास बालीघाटे , बंडू पाटील, सागर मादनाईक , शैलेश आडके , शंकर नाळे , अनिल चव्हाण, उपस्थित होते . सदर निवेदन दिल्यानंतर मोटर सायकल रॅलीने आंदोलकर्ते निघून गेले.
दरम्यान अंदोलन अंकुश संघटना पदाधिकार्यानी काही तासाने स्वतःहून ठिय्या आंदोल मागे घेतले
उसाला स्वाभिमानी कडून ४०० तर अंकुश संघटनेकडून कारखानदाराकडून ५०० रुपयाची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी :