सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर ! संतोष मस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील म्हसर ता.भोर येथील महिला शेतकरी रविवार दि .१ खाजगी रानात जनावरे चालण्यासाठी गेले असताना सायंकाळच्या वेळी बिबट्याने चरणाऱ्या गायांच्या कळपावर हल्ला चढविला यात एका गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेत शेतकऱ्याचे २४ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला आहे.म्हसर परिसरात मागील दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान बिबट्याने आठ दिवसांपूर्वी येथीलच शेतकरी संतोष बाबू काळे यांची शेळी फस्त केली. बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी म्हसार परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
COMMENTS