बारामती ! दसऱ्याच्या मुहूर्तावर 'सोमेश्वर'चा हंगाम सुरू : कार्यक्रम दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी मिरवणूक व भव्य नागरी सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 
६२ वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजन कार्यक्रम मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. 
          यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, खंडाळा-वाई चे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  सोमेश्वर कारखान्यावर भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
         सद्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन ते सव्वा दोन लाख टन ऊस कमी झाला आहे. पाण्याअभावी काही सभासदांचा ऊस जळाला, काहींनी चाऱ्याला दिला तर काहींनी गुऱ्हाळाला दिला. सद्या सोमेश्वरकडे ३७ हजार एकरातील साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. तसेच गेटकेन दीड ते दोन लाख टन उपलब्ध करून १४ लाख टन ऊस गाळपाचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच एकरी ३७ ते ४१ टनाची सरासरी होती. यावर्षी एकरी ३३ टन बसण्याचा अंदाज शेतकी विभागाने वर्तवला आहे. सद्या कमी पावसामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष आहे त्यामुळे मंत्री समितीने १ नोव्हेंबर पासून ऊस गाळापासाठी परवानगी दिली आहे.  येणाऱ्या गाळप हंगामासाठी सोमेश्वरकडे ९५० बैलगाडी, ४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ४०५ डंपिंग तसेच १७ हार्वेस्टर यंत्रणाचे करार पुर्ण झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन ९ हजार टनाच्या सरासरीने गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. 
To Top