सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जय पवार यांच्या हस्ते पार्थदादा केसरी मैदानात फायनल साठी मानकरी ठरलेल्या व्हाईट गोल्ड बादल आणि पब्लिक किंग बाजीराव या करंजेपुलकरांच्या बैलजोडीची सन्मान करण्यात आला.
निंबुत येथे पार पडलेल्या पार्थ दादा पवार केसरी या बैलगाडा शर्यती मधे फायनल साठी पात्र ठरलेल्या करंजेपुलकरांच्या बादल आणि बाजीराव या बैलजोडीच्या मालकांचा सन्मान जय दादा पवार यांच्या हस्ते करंजेपुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयामधे पार पडला. या शर्यती मधे तब्बल ६०० बैलजोडीनी सहभाग घेतला होता. जास्त अंधार झाल्यामुळे फायनलचा फेरा होऊ शकला नाही.
जय दादा पवार यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमेश्वरनगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या वेळी सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, करंजेपुलचे उपसरपंच निलेश गायकवाड,मा.तंटामुक्ती अध्यक्ष सागर गायकवाड, हरिष गायकवाड,सुहास गायकवाड,मंगेश गायकवाड,योगेश गायकवाड,प्रशांत रिठे,काका घाडगे, अरुण निकम,बबन पवार, प्रभाकर सोनवणे,माऊली गायकवाड,हर्षद दगडे,सोनू पाटोळे उपस्थित होते.