सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
निवडणुका जवळ आल्या की विरोधक राजकीय द्वेष भावनेने आरोप- प्रत्यारोप करीत असतात. राजगड सहकारी संस्था असून कोणाच्या बापाची नसून सर्वांच्या मालकीची आहे.आव्हानात्मक काळातही शेतकरी,कामगार तसेच व्यापाऱ्यांची देणे लवकरच देऊन राजगड पूर्ण क्षमतेने गाळप करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शनिवार दि.२१ राजगड कारखान्याच्या गेटवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वय कुलदीप कोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या विरोधात आरोप केले होते.याला प्रत्युत्तर राजगड सहकारी कारखाना आनंतनगर निगडे येथे रविवार दि.२२ पत्रकार परिषद घेवून कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे दिले.यावेळी व्हा.चेअरमन पोपट सुके, संदीप नगीने, सुभाष कोंढाळकर ,उत्तम थोपटे, शिवाजी कोंडे, विकास कोंडे, सुधीर खोपडे, कार्यकारी संचालक एस.के.पाटील व कर्मचारी उपस्थित होते.