सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बामणोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग ठाणे, प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कुरुंजी ता.भोर जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन घोडेगाव प्रकल्प कार्यालय मधील आदिवासी निरीक्षक एस.एस.पवार,मुख्याध्यापक ए.एम.चौगुले यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.सदर स्पर्धा ९ ते ११ ऑक्टोंबर या दरम्यान घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील बामणोली ता.जावली,गोगवे ता.महाबळेश्र्वर कोल्हापूर जिल्ह्यातील कोते ता.राधानगरी, बोरबेट ता.गगनबावडा पुणे जिल्ह्यातील कुरुंजी ता.भोर, पांगारी ता.भोर,चिंचवड गाव पुणे ,कामशेत ता.मावळ, माळेगाव या नऊ शाळांमधील सुमारे तीनशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धा कबड्डी,खो - खो, हॉलीबॉल या सांघिक खेळांसह थाळी फेक,भाला फेक,गोळा फेक,लांब उडी,उंच उडी,धावणे,रीले,चालणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारमधील खेळ देखील घेण्यात आले.या स्पर्धामध्ये उत्कृष्ट खेळणाऱ्या खेळाडूंची घोडेगाव प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुरुंजी केंद्रामधून निवड करण्यात आली आहे.सदर स्पर्धा व्यवस्थित व निर्विघ्न पने पार पाडल्याबद्दल घोडेगाव प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी सहभागी शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व खेळाडूंचे अभिनंदन केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चौगुले यांचे मार्गर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची मदत करून स्पर्धा यशस्वी पणे पार पाडल्या.
COMMENTS