सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दैनंदिन जीवनात तसेच सन,उत्सव काळात कितीही ताण - तणाव आला तरी पोलीस बांधव नेहमीच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात.त्यामुळे पोलिसांचे आरोग्य निरोगी असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हरी जीवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमित शेठ यांनी केले.
भोर येथे हरिजन हॉस्पिटलच्या वतीने भोर पोलीस उपविभाग येथील भोर, राजगड ,सासवड या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरावेळी डॉ.अमित शेठ शुक्रवार दि.१३ बोलत होते. मोफत आरोग्य शिबिरात भोर,सासवड व राजगड पोलीस ठाण्यातील ५० कर्मचाऱ्यांच्या एक्स-रे,ईसीजी ,रक्त ,लघवी ब्लडप्रेशर, तपासणी करून एच.आय.व्ही.,मेडिसिन,आहार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला.शिबिरासाठी डॉ . ओंकार थोपटे (कार्डिओलॉजिस्ट ),डॉ. शुक्ला (सोनोग्राफी तज्ञ )यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी हरजीवन हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.उदय शेठ ,भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे ,पोलीस निरीक्षक शंकर पाटील,अण्णासाहेब घोलप, उपनिरीक्षक सुप्रिया दूरंदे,तुषार साळेकर, तन्मय कुंभार आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.