सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील दोन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील मैदानी खेळासाठी निवड झाली आहे. यामध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी तनुष्का भुजबळ हिने १४ वर्षे वयोगटातील गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर शाळेतील इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी होळकर हिने १७ वर्षे वयोगटाखालील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
या तालुका स्तरीय स्पर्धांचे आयोजन दिनांक दि १२ ऑक्टोबर रोजी शारदानगर क्रीडा संकुल, शारदानगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती व बारामती परिसरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. शाळेतील क्रीडाशिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांच्या तयारीसाठी सदिच्छा दिल्या.