सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
प्रशासनाच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम भोर तालुक्यातील पुणे जिल्हा बँकेच्या ११ शाखांमध्ये बुधवार दि.४ यशस्वीरित्या राबविण्यात आला.
उपक्रमांतर्गत बँकेच्या ज्येष्ठ खातेदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तर एक तास नेरे,आंबवडे, आपटी, ब्राह्मणघर,कापूरहोळ, किकवी,नाव्ही,नसरापूर शिवरे,भोर नं.१, भोर नं.२ शाखांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपापल्या बँकेच्या आवारातील केर-कचरा साफसफाई करून स्वच्छता केली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी बँकेसह गावचा परिसर तसेच घराचे आवार आपणच स्वच्छ करून ठेवले पाहिजे अशी शपथ घेतली.यावेळी विकास अधिकारी मुकुंद थोपटे, वसुली अधिकारी विनोद काकडे ,भोर शाखेचे व्यवस्थापक लक्ष्मण गिरे,सत्यवान आवाळे,सचिन जेधे,भरत भिलारे,सुभाष खोपडे, सुप्रिया डोंबे, महेश बोबडे ,सुखदेव बागल, पूनम काकडे, सायली मोहिते ,काशिनाथ भिसे,राजेन्द्र,राजेंद्र थोपटे , ओंकार कानडे,माउली सावले,अनिल थोपटे उपस्थित होते.
COMMENTS