पुरंदर ! नीरा येथील श्रमवीर उत्कर्ष पतसंस्थेच्या सभासदांना आठ टक्के लाभांश : संस्थेची रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----    
 निरा : प्रतिनिधी विजय लकडे.  
श्रमवीर उत्कर्ष पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि 30.9.23  रोजी संस्थापक चेअरमन राजेंद्र काकडे सचिव धनंजय यादव सर्व संचालक व सभासद यांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात पार पडली.  
      संस्थेने यावर्षी सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर केला संस्थेचे भाग भांडवल 84 लाख दहा हजार रुपये असून सभासद संख्या 711 आहे.  
        1998 साली अवघ्या 27 हजार शंभर रुपये भाग  भांडवल वरती चालू केलेल्या पतसंस्थेचे रूपांतर आता मोठ्या वटवृक्षात झाले आहे. दुर्बल घटकासाठी चालवलेली पतसंस्था अशी संस्थेची ख्याती  आहे.   
     संस्थेचे संचालक संजय निगडे यांची पुणे जिल्हा भाजप सचिव पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने चेअरमन व संचालक मंडळ यांच्या हस्ते निगडे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी संस्थेच्या सभासदांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले संस्थेमार्फत दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. 
To Top