सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील आंबाडे ता.भोर येथे चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी बंद घर फोडून तांब्याची भांडी, हांडे, बंब, बत्ते असे एकूण १ लाख रुपयांचे ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
आंबाडे ता.भोर येथे शिरवळ येथून दादासो आनंदराव मोरे यांच्या घरातील फर्निचर घेऊन आलेले पिकआप वरील कामगार यांनी चोरी केल्याचा संशय मालक दादासो मोरे तसेच भोर पोलीस यांना आल्याने तात्काळ चौकशी केली असता पिकअप गाडीवरील कामगार यांच्या घरी शिरवळ येथे चोरी केलेला ऐवज काही तासातच सापडला.चोरट्यांना पकडण्यात यश आले असले तरी पकडलेले चोरटे पळून गेल्याची घटना घडली.
COMMENTS