सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. 
         तसेच या अभियानाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख समन्वयक राजेश पांडे, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .सतीशराव काकडे होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक आर.एन.शिंदे, डॉ. सदानंद भोसले पुणे जिल्हा आयोजन समिती अध्यक्षा बागेश्वरी मंठाळकर, विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य नितीन घोरपडे, सागर वैद्य, संदीप पालवे सिनेट मेंबर प्रसन्नजीत फडणवीस, राहुल पाखरे, डॉ. सुनील लोखंडे तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अभिजीत काकडे वाघळवाडी गावचे सरपंच अॅड. हेमंत गायकवाड, सैनिक कल्याण संघ बारामती अध्यक्ष.प्रशांत शेंडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीशराव लकडे व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना मेरी माटी मेरा देश या अभियानाची शपथ देण्यात आली.
        यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपण हा भारत सुजलाम सुफलाम बघत आहोत, त्यासाठी काही लोकांनी बलिदान, आहुती दिली आहे, त्याग केला आहे, त्याची कुठेतरी जाणीव व्हावी या उद्देशानेच 'मेरी माटी मेरा देश' या अभियानाची संकल्पना देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ती पुढे आली व "ही माती बलिदानाची आहे, ही माती त्यागाची आहे. ही माती माणसाची जाणीव जागृती करणारी आहे" असे विचार मांडले. 
         तसेच या अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक राजेश पांडे म्हणाले "देशाच्या पंतप्रधानांनी जे स्वप्न पाहिले आहे की, या देशाची माती ही त्यागाची, समर्पणाची, स्वाभिमानाचे आहे, आणि त्या मातीचा मान संपूर्ण भारतीयांनी राखला पाहिजे." 140 कोटी भारतीय जनतेच्या सहभागातून गोळा झालेल्या मातीतून दिल्ली येथे अमृतवाटिका तयार होणार आहे आणि तेथे साडेसात हजार वृक्षांचे वन तयार केले जाणार आहे असे विचार या अभियानाबद्दल त्यांनी मांडले आणि शेवटी 'मातीला नमन वीरांना वंदन' ही संकल्पना आपण रुजवली पाहिजे असे विचार मांडले आहे. 
      अध्यक्षीय मनोगता मध्ये महाविद्यालयाचे अध्यक्ष  सतीशराव काकडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या अभियानाची तालुक्यातून आम्हाला आयोजनाची संधी दिल्याबद्दल आभार मानले व महाविद्यालयाच्या पन्नास वर्षाचा थोडक्यात आढावा घेतला. 
      तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून, उपस्थित तेरा महाविद्यालयाचे सर्व समन्वयक व विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करून या अभियानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. 
       यावेळी या आयोजनाचे जिल्हा समन्वयक बागेश्वरी मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ कार्यक्रम अधिकारी डॉ.सदानंद भोसले, सैनिक कल्याण संघाचे  अध्यक्ष.प्रशांत शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक, तालुक्यातील अन्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी तसेच विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. जगन्नाथ साळवे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अच्युत शिंदे, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. मेघा जगताप, आयक्युसीचे समन्वयक डॉ. संजू जाधव, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.जया कदम डॉ. प्रवीण ताटे- देशमुख,  कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. कल्याणी जगताप यांनी केले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न
बारामती ! काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiIvLB4BfTL-ONzzWMO0-uIOAKvUZu8awRhrqNObgPBNQQpGy35Fg2YBV_aZqfBQr9TPaadND5FyL3Hpp60iSRYyJDNZT_B1Kf1O9yukUoatEdJjmKeenPSfJiVV7P9JIJch62dQ94wQnC2NMab9n1KheSVmAby1Rg7Utg4mcdsEvlIjvufh7kAqzAm2MAQ
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiIvLB4BfTL-ONzzWMO0-uIOAKvUZu8awRhrqNObgPBNQQpGy35Fg2YBV_aZqfBQr9TPaadND5FyL3Hpp60iSRYyJDNZT_B1Kf1O9yukUoatEdJjmKeenPSfJiVV7P9JIJch62dQ94wQnC2NMab9n1KheSVmAby1Rg7Utg4mcdsEvlIjvufh7kAqzAm2MAQ=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/10/blog-post_5.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/10/blog-post_5.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy