बारामती ! दूधदर वाढीसंदर्भात स्वाभिमानी संघटनेची उडी : रविवारी राज्यभरातील शेतकरी एकवटणार, जेजुरी-बारामती रस्त्यावर रास्तारोको

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती :- प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील तरडोली येथे दुधाला ४० रुपये भाव मिळावा, चारा छावणी सुरु व्हाव्यात यांसह अनेक मागण्यांसह  रवीवार दि.  पासून येथील सागर जाधव या शेतकरी युवकाने उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी स्वाभीमानी संघटने मार्फत रास्ता रोको केला जाणार आहे .

  बारामती तालुक्याचा पश्चिम पट्ट्टा  कायम दुष्काळी पट्टा म्हणून राज्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांना  दुष्काळ पाचवीला पुजला आहे. यामुळे जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहीले जाते. मात्र दुधाला उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत असलेल्या दरामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे विविध मागण्यांसाठी तरडोली येथील  युवक शेतकरी सागर पंडीत जाधव यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.  उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.  मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. राज्यातील  शेकडो शेतकरी दररोज पाठिंबा देण्यासाठी तरडोली येथे येत आहेत.

 काल  मध्यरात्री स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम पदाधीकाऱ्यांनी  उपोषणास्थळी भेट दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या उपोषणास  पाठिंबा घोषित केला असून  उद्या  मोरगाव - बारामती   पुणे जिल्हा मार्ग क्र ६५ वर होणार रस्ता रोको केला जाणार आहे . तसेच  परीसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  स्वाभिमानी संघटनेचे युवक  प्रदेशाध्यक्ष  अमरसिंह कदम  यांनी केले आहे.

To Top