सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने ग्रामीण डाक सेवकांना आठ तासाचे काम देऊन खात्यात समाविष्ट करा,१८० दिवसांची रजा व वैद्यकीय सुविधा द्यावी, ग्रॅज्युएटी पाच लाख करण्यात यावी,१२,२४,३६ प्रमाणे पदोन्नती द्यावी या व इतर प्रलंबित मागण्यासाठी बुधवार दि.१ एक दिवशीय पुकारलेल्या संपात भोर तालुक्यातील शंभर टक्के डाकसेवक उतरून उत्कृष्ट प्रतिसाद देत संप यशस्वी केला.
डाकसेवकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय संप पुकारला होता.या संपात भोर तालुक्यातील शेकडोहून अधिक ग्रामीण डाकसेवक सामील झाले होते.या संपामुळे सरकारला जाग आली नाही तर ५ डिसेंबर पासून देशातील डाक कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष वसंत चरेकर,सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिला आला आहे.संप यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोळे, सुभाष साळेकर, दत्तात्रय वरे ,अशोक कंक,अश्विनी शिंदे, यशवंत पवार, संतोष बुदगुडे ,संतोष सणस ,सुनील साळुंखे, कृष्णा बिलवरे,सोमनाथ माळी, चंद्रकांत डाळ, तुषार धुमाळ, नवनाथ राठोड ,सोहेल मनेर, सविता भागवत, वैशाली जेधे ,सुजाता कोंढाळकर आदिंसह शेकडो डाक सेवकांचे सहकार्य लाभले.
COMMENTS