बारामती ! सोशल मीडियावर 'सोमेश्वर'ची साखर झाली कडू का? दिवाळीला सभासदांना १० किलोच साखर मिळणार हे गेल्यावर्षीच ठरलंय : माहीत नसेल तर वाचा हा ठराव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
दिवाळी काही दिवसांवर आली असताना सोमेश्वर कारखान्याकडून दरवर्षी सभासदांची दिपावली गोड व्हावी म्हणून दिपावली निमित्त अधिकची साखर देत असते. पण हा गोडवा कमी केल्याच्या तिखट प्रतिक्रिया सोशल मिडियातुन अनेक सभासद मांडत असून त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
        पण आता या सोशल मीडियात मांडलेल्या मुद्यावरून चर्चा झडत असताना दीपावलीची ३० किलो साखर मिळालीच पाहिजे ? असा सूर लावला जात आहे. पण वार्षिक सभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार १० किलो साखर देण्याचा निर्णय झाल्याने आता दिवाळीची १० किलो साखर मिळणार आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सन -२०२१-२२ च्या झालेल्या मागील वर्षाच्या वार्षिक सभेत  विषय क्रमांक ९ मधील ऊस क्षेत्राच्या प्रमाणात शेअर्स (भाग) असणेबाबत मा.संचालक मंडळाने शिफारस केलेल्या धोरणाबाबत विचार करणे हा विषय वार्षिक सभेत मांडला होता. 
        या विषयावर जवळपास १० सभासदांनी चर्चेत भाग घेतल्याचे कारखान्या कडील प्रोसेडिंग मध्ये दिसून येत असून त्यावर झालेल्या ठरावामध्ये एप्रिल २०२३ पासून भागाचे प्रमाणात प्रति शेअर्स (भाग) प्रति माह ५ किलो व दीपावलीच्या सणाकरिता प्रति सभासद १० किलो या प्रमाणात सवलतीच्या दराने साखर देण्यात यावी  असा ठराव मंजूर करण्यात आला होता.
       मागील वर्षी झालेल्या सभेतील प्रोसेडिंग मधील विषयास यावर्षी  दि. २९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या  सभेत मागील वार्षिक सभेच्या प्रोसेडिंग मधील ठरावास मंजूर देणे हा १ नंबरचा विषय घेण्यात आला होता. या   विषयावर अनेक तास चाललेल्या चर्चेअंती १ नंबरचा असलेल्या विषयासह इतर सर्वच विषया सोबत मागील प्रोसेडिंग मंजूर झाल्याने गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे दिपावलीला १० किलो साखर देण्याच्या विषयास मंजुरी देत तो विषय कायम केला  आहे.
       त्यामुळे आता वार्षिक सभेत झालेल्या ठरावानुसार दीपावलीची साखर १० किलो मिळणार असून हीच सोशल मीडियावर रंगलेली चर्चा वार्षिक सभेत रंगली असती तर काहीसा निर्णय होऊ शकला असता ? असे  आता बोलले जात आहे. 
To Top