पुरंदर ! निरा येथे खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------     
 निरा : विजय लकडे.   
नीरा ता. पुरंदर येथे पालखीतळासमोर खाजगी बसच्या धडकेत दुचाकी गाडीवरील एकजण धडकून गंभीर रित्या जखमी झाला आहे.    
       नाथ कृपा ट्रॅव्हल क्र MH 16 BC4050 ही बस गाडी लोणंद होऊन नगरच्या दिशेने जात असता नीरा येथील पालखीतळासमोर राजेंद्र प्रल्हाद पवार वय 45 रा चौधरवाडी हे आपल्या भावाला आणण्यासाठी नीरा रेल्वे स्टेशन कडे निघाले असता ट्रॅव्हल आणि बुलेटची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे.   
      आम आदमी पक्षाचे पुरंदर तालुका युवकचे अध्यक्ष महेश जेधे व आकाश गायकवाड यांनी आपल्या गाडीतून दुचाकीस्वारास लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.  
      पुढील तपास निरा पोलीस करत आहेत
To Top