सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
वरंधा घाटातील शिरगाव येथे रविवार दिनांक आठ मध्ये रात्री पुणे हुन चिपळूण कडे जाणारी मिनी बस चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने ६० ते ७० फूट दरीत कोसळली.अपघातातील प्रवासी सुखरूप असून दोन ते तीन व्यक्तीं किरकोळ जखमी असल्याने भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणेहुन(स्वारगेट) वरंधा ता. भोर घाटातून महाडमार्गे चिपळूणकडे १० प्रवाशांना घेवून जाणारी एमएच ०८ येपी १५३० ही मिनीबस पहाटे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीत कोसळली.सदर आपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामधील तीन ते चार जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कमी पाठवण्यात आले.भोर पोलिसांना माहिती मिळतात तात्काळ पोलीस निरीक्षक शंकर पाटील तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून,भोर रेस्क्यू तसेच मौजे शिरगाव येथील पोलीस मित्र यांनी सदर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
COMMENTS