सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संतोष म्हस्के
वरंधा घाटातील शिरगाव येथे रविवार दि.८ मध्यरात्री पुणेहुन चिपळूणकडे जाणारी मिनी बस चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने ६० ते ७० फूट दरीत कोसळली.अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जखमी चार जणांना पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.तर इतर प्रवासी सुखरूप असल्याचे भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणेहुन(स्वारगेट) वरंधा ता. भोर घाटातून महाडमार्गे चिपळूणकडे १० प्रवाशांना घेवून जाणारी एमएच ०८ येपी १५३० ही मिनीबस पहाटे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीत कोसळली.पोलिसांना माहिती मिळतात तात्काळ पोलीस निरीक्षक शंकर पाटील तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून,भोर रेस्क्यू तसेच मौजे शिरगाव येथील पोलीस स्थानिकांनी किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना सुखरूप मात्र उपचारादरम्यान भोर येथे एकाचा मृत्यू झाला.