सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी हिर्डोस मावळ खोऱ्यातील कुडली बुद्रुक ता.भोर येथे बोटुलिझम आजाराने हाहाकार माजविला असून या आजाराने ६ जनावरे दगावली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पशुसंवर्धन विभागाकडून उपाय योजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कुडली बुद्रुक ता.भोर येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा कंक यांची १ गाय व १ वासरु, गेणबा चंदरु कंक ३ गायी, लक्ष्मण धोंडिबा खरुसे यांची १ गाय अशी सहा जनावरे बोटुलिझम रोगाने दगावली आहेत. तर राजू मारुती कंक याच्या गायीची अवस्था चिंताजनक असून त्या गाय वर उपचार सुरू आहेत. महागाईची दुप्ती जनावरे अचानक आजारी पडून तीन चार दिवसात दगावत असल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान होत आहे.