सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या सातारा भरारी पथकाने रात्री 09.30 च्या सुमारास अचानक धाडी टाकून हॉटेल चालक तानाजी बापू गायकवाड रा. शहाबाग ता. वाई यास शासनाचा अधिकृत मद्यविक्री परमिटरुम बिअरबार परवाना नसताना ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्याचे विरुदध कारवाई केली आहे.
डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण संचालक, विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली किर्ती शेडगे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात हॉटेल / ढाब्यांवर कारवाईचा धडाका सुरु असतानाच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) अन्वये तसेच सदर हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात विना परवाना मद्य सेवन केल्याबद्दल 1) श्रेयस सुभाष सावंत वय 26 वर्षे रा. साकीनाका 2) दत्तात्रय आनंदा वाडकर वय 31 वर्षे 3 ) दिग्विजय शांताराम वाडकर वय 23 वर्षे 4) अभिषेक अशोक गायकवाड वय 21 वर्षे 5) वैभव लक्ष्मण वाडकर वय 29 वर्षे 6) मयुर महादेव वाडकर वय 24 वर्षे सर्वण राहाणार वयगांव ता. वाई जि. सातारा 7) ओमकार सुरेश दुधाणे वय 24 वर्षे 8)राहुल उर्फ आशिष सुभाष दुधाणे वय 24 वर्षे 9) सुमित भरत दुधाने वय 28 वर्षे 10) अमर संतोष दुधाने वय 26 वर्षे सर्वजण राहणार खिंगर ता. महाबळेश्वर यांचे विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयात आरोपींच्या ताब्यातून टेबले, खुर्च्या, विविध ब्रँडच्या विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6,585/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, सोमनाथ माने, सहा. दु. निरीक्षक महेश मोहिते, जवान सागर आवळे, अरुण जाधव, आबासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला.
COMMENTS