सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून कालपासून ऊसतोडणी सुरू झाल्या आहेत. आजपासून प्रत्येक्ष ऊस गाळपास सुरुवात होणार असल्याची माहिती
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
येथील सोमेश्वर कारखान्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सचिव कालिदास निकम, ऊसविकास अधिकारी विराज निंबाळकर आदी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, सद्या कारखान्यावर १९० बैलगाडी, १५५ डंपिंग तर २२४ ट्रक-ट्रॅक्टर वाहने दाखल झाली असून काल (दि. ३१) रोजी ऊसतोडणी सुरू झाल्या असून आज पासून प्रत्येक्ष ऊस गाळपास सुरुवात होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४३ हजार ५०१ एकर उसाची नोंद झाली होती. त्यामध्ये दुष्काळ आणि चाऱ्यासाठी तुटलेल्या उसाची घट पकडून सद्या कारखान्याकडे ३७ हजार २०० एकरातील सरासरी एकरी ३४ च्या सरासरीने १२ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. तर दीड ते दोन लाख टन गेटकेन ऊस आणण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.असे १४ लाख टन ऊस गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच गत हंगामातील उसाचा ३ हजार ३५० पन्नास रुपये दर देत ऑक्टोबर व नोव्हेंबरपासून ऊस लागवड व खोडव्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये ऊस लागवड करणाऱ्या सभासदाला टनाला ७५ रुपये अनुदान तर डिसेंबर नंतर ऊस लागवड व खोडवा राखणाऱ्या सभासदांसाठी टनाला १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जानेवारीत ७५ रुपये, फेब्रुवारीत १०० रुपये तर मार्चपासून ऊस तुटुन जाईपर्यंत टनाला १५० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
-----------------
ऊसाचे पाचट जाळू नका
यावर्षी धरणारील पाण्याची परिस्थिती पाहता निरा डाव्या कालव्याला दोन पाळ्याच पाणी सुटणार आहे. त्यामुळे निरा खोऱ्यातील बागायती पट्ट्यात देखील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यामुळे तुटून गेलेल्या उसाचे पाचट न जाळता रानात उसाचे पाचटाचे आच्छादन करावे जेणेकरून ऊसपिकाला कमी प्रमाणात पाणी लागेल.
राजेंद्र यादव
कार्यकारी संचालक, सोमेश्वर कारखाना
COMMENTS