सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
रेल्वेतील एका सहप्रवासाने ११२ नंबरला कॉल करून महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेत एक महिला प्रवास करत असुन त्या गरोदर आहेत. त्यांचे पोटात खुप दुखत आहे. त्याचे सोबत एक लहान मुलगा सुध्दा आहे. त्यांना मदत पाठवा असा कॉल हा नियंत्रण कक्ष डायल ११२ प्राप्त झाला होता.
सदरचा कॉल हा डायल ११२ नियंत्रण कक्ष येथुन हा कॉल सातारा जिल्ह्यातील कराड शहर पो ठाणे कडील जलद प्रतिसाद पथक या वाहणावर पाठवला व त्या कॉलची पुर्तता जलदगतीने करण्याबाबता सतत पाठ पुरावा केला. तसेच कराड शहर पो ठाणे कडील जलद प्रतिसाद पथक वाहणावर नेमले पोलीस अंमलदार यांनी या कॉलचे गांभिर्य ओळखुण अॅब्युलन्सला बोलावुन घेवुन सदर कॉलरला कॉल करुन गरोदर महिलेस कराड रेल्वे स्टेशन येथे उतरणे बाबत कळविले.
सदर महिला हि रेल्वे फलाट क्रमांक एक वर उतरताच त्या महिलेची प्रसुती झाली. सदर महिला व तिचे बाळास डायल ११२ चे कराड शहर पो. ठाणे जलद प्रतिसाद पथकातील कर्मचारी यांनी अॅब्युलन्सच्या मदतीने सुखरुप कॉटेज हॉस्पीटल कराड येथे दाखल केले आहे.
सदरच्या कॉलची पुर्तता पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली DIAL११२ चे म. पोउनि. श्रीमती काटकर, पो.हवा १५७१ ढवळे, पो.हवा ८९९ चव्हाण, पो. हवा१४० पोळ, मपोकों१९१७ जगदाळे, मपोकॉ१८१६ दिक्षित व कराड शहर पो ठाणे कडील जलद प्रतिसाद पथक या वाहनावर नेमले पोलीस अंमलदार म पो हवा-२२१७ डुबल पो कॉ. -१०९३ सय्यद, पो. कॉ.-७५० होनमाने यांनी केलेली आहे
COMMENTS