सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वन्यप्राणी शिकार प्रकरणातील आरोपी अविनाश पिसाळ याचेवर गुन्हा दाखल असुन, त्याचे राहते घरावर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी छापा मारुन ३ पिस्टल २ गावठी कट्टे ७८ जिवंत काडतुस व २७० रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या, वन्य प्राण्यांचे अवशेष हस्तगत करुन पुढील तपास वाई पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे यांचे अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांचेकडे सोपविण्यात आला. यातील आरोपीकडे अधिकचा तपास करुन त्यास विश्वासात घेऊन त्याने बावधन येथील त्याचे जनावरांचे गोठ्यात लपवुन ठेवलेले १ पिस्टल व १ जिवंत काडतुस त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी.बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार राहुल भोईर, अजित जाधव पोलीस अंमलदार हेमंत शिंदे श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेमजीत शिर्के, गोरख दाभाडे यांनी केली आहे. मा पोलीस अधिक्षक समीर शेख व.अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी वाई पोलीसांचे अभिनंदन
केले आहे.