भोरला ५३० जणांची मोफत नेत्रतपासणी : ५०० जणांना चष्म्याचे वाटप तर ७० जणांचे होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरला उत्रोली येथे भाजपा भोर विधानसभा प्रमुख किरण दगडेपाटील यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ५३० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ५०० जणांना चष्मे वाटप केले गेले. तर ७० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.अशी माहिती भोर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी दिली.
          भोर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर रविवार दि.१५ आयोजित करण्यात आले होते. शिबिरात माई फाउंडेशन पुणे यांचे सहकारी लाभले.यावेळी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, डॉ. नागेंद्र चोबे ,आशा शिवतरे ,ओंकार गोरड, महेश तांगडे, दिपाली शेटे ,मनीषा राजीवडे उपस्थित होते.दरम्यान दगडे पाटील यांनी उत्रोली गणात नेरे,अंबाडे,बालवडी,वरवडी, पळसोशी,पाले, बाजारवाडी,भाबवडी ,धावडी,खानापूर येथील कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधून गावभेट दौरा केला.
To Top