बारामती ! यावर्षी ऊस टंचाईचे संकट असले तरी माळेगाव १५ लाख टन ऊसाचे गाळप करणार : ६७ व्या अग्नी बॉयलर प्रदीपन सोहळ्यात अध्यक्ष ॲड.केशवराव जगताप यांचा विश्वास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगांव : प्रतिनिधी
ऊस टंचाईचे संकट असले तरी ही माळेगाव १५ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा विश्वास अध्यक्ष ॲड.केशवराव जगताप यांनी व्यक्त केला आहे.
     बारामती तालुक्यातील माळेगाव येथील सहकारातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६७ वा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा अध्यक्ष ॲड.केशव जगताप व त्यांच्या पत्नी शांताबाई जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील, संचालक बाळासाहेब तावरे,रंजन तावरे,तानाजी कोकरे,मदन देवकाते, संजय काटे, मंगेश जगताप, संगिता कोकरे, कामगार व सभासद उपस्थित होते.
     यावेळी बोलताना अध्यक्ष ॲड.केशवराव जगताप म्हणाले की,हा अतिशय आव्हानात्मक व खडतर असा गळीत हंगाम आहे.सभासदांचा उपलब्ध ऊस व गेटकेन धारक यांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर आणी कामगारांच्या सहकार्याने हा हंगाम यशस्वी पार पाडु.यावेळी विरोधी संचालक रंजन तावरे, सुरेश देवकाते, प्रकाश देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले, अशोक तावरे, सोपान आटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमाचे स्वागत उपाध्यक्ष तानाजी देवकाते, सुत्रसंचलन सुरेश देवकाते तर आभार कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मानले.
To Top