सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या ६२ व्या गळीत हंगामाचा बॅायलर अग्नि प्रदिपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पार पडत आहे.
कारखाना येणाऱ्या हंगामात १४ लाख मे.टन उसाचे गाळप करणार असून कारखाना अंतर्गत सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ऊसतोडणी कामगारांचे करार पूर्ण झाले आहेत. सोमेश्वरकडे सभासदांचा सव्वा बारा लाख तसेच गेटकेन धारकांचा दोन लाख मे. टन ऊस आणून कारखाना १४ लाखापेक्षा जास्त ऊसाचे गाळपाचे नियोजन आहे. आडसली, पूर्व हंगामी, सुरु व खोडवा असा मिळून 37 हजार एकर ऊस उपलब्ध आहे.
येणाऱ्या गाळप हंगामासाठी सोमेश्वरकडे ९५० बैलगाडी, ४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ४०५ डंपिंग तसेच १७ हार्वेस्टर यंत्रणाचे करार पुर्ण झाले आहेत.
COMMENTS