सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या आठवडे बाजारात मंगळवार दि.२४ नीळकंठ येथील एका महिलेचे पैशांचे पाकिट पडले होते. प्रामाणिकपणा दाखवित व्यापारी कल्पना रघुनाथ मोरे यांनी ते पाकीट पैशांसह खात्री करून परत केले.
आठवडे बाजार खरेदीसाठी तसेच दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या निळकंठ ता.भोर येथील महिला शांताबाई श्रीपती राउत यांचे बाजार करीत असताना १ हजार रुपये असलेले पाकीट वरदळीच्या रस्त्यावर पडले होते.बराच वेळ पैशांचे पाकीट शोधूनही शांताबाई यांना सापडत नव्हते. शांताबाई हिरमुसल्या होऊन बाजारात फिरत असताना माझे पैशांचे पाकीट पडले आहे.कोणाला सापडले का असे विचारताच भाजीपाला विक्री करनाऱ्या व्यापारी महिला मोरे यांनी शांताबाई राऊत यांना विश्वासात घेऊन पैशांचे पाकीट परत केले.पैशांचे पाकीट परत मिळताच शांताबाईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
COMMENTS