Indapur Big Breaking ! सोलापूर हायवेवर दोन बसची शर्यत ! आठ दुचाकी उडवल्या...एक ठार दोन जख जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भिगवण : वार्ताहर आकाश पिसाळ
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी बसखाली गंगाराम सोमा पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.भिगवण बस स्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.बस स्थानकासाठी असणाऱ्या सर्विस रस्त्याने येणाऱ्या दोन बस चालकामध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.यावेळी उजव्या बाजूने असणार्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला मात्र डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बस खाली चिरडले गेले.यावेळी अपघात ग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली मात्र तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगारल्या गेल्या.या अपघातात मृत पवार यांच्यासह दोन जन जखमी झाले.अपघातानंतर बस चालकाने भिगवण पोलीस ठाण्यात हजर होवून ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र १०० फुटावरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली.

To Top