सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई शहरातील गणपती आळी येथे जुन्या असलेल्या सकुंडे वाड्याला आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
आगीने रौद्ररूप धारण केले आगीची माहिती मिळताच घटनास्थळी वाई पालिकेचा अग्निशामक दलाचा बंब पोहोचला आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र तळमजल्यात काही व्यवसायिकांची दुकाने होते त्यामुळे तारांबळ उडाली होती बघ्यांनी गर्दी केली होती अग्निशामक दलास आग विझवण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.