सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
सोमेश्वर कारखान्याने सभासदांची दिवाळीची साखर ३० किलोवरून १० किलो केली आहे याबाबत सभासदांना दिवाळीसाठी ३० किलो साखर देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे पुरंदर युवकचे तालुकाध्यक्ष महेश जेधे यांनी केली आहे.
याबाबत जेधे यांनी कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण गरिब शेतकरी सभासदांना दिवाळीला साखर वाटप संदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळाली. तर सदर साखर वाटपाचा निर्णय वाचल्यानंतर आमच्या मनाला खुप वेदना झाला. त्या वेदना होण्या मागचे कारण असे होते की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर आपल्या गरिब शेतकरी सभासदांना प्रति वर्षी ३० किलो प्रमाणे प्रति किलो १५/- रुपये दराने दिवाळीला साखर वाटप करण्यात येते. सणासुदीला गरिब शेतकरी सभासदांना कमी किमतीमध्ये साखर उपलब्ध करुन आर्थिक सहकार्याचा कारखान्याचा उदेश असतो. तरी यावर्षी दुष्काळ पडलेला असताना, आर्थिक मंदी आलेली असताना, (गरीब शेतकरी सभासदाकडे पैशांची कमतरता असताना) दिवाळीला साखर वाटपाचा कोटा प्रति सभासद ३० किलो वरुन ५० किलो करणे अपेक्षित असताना, कारखान्याने ती १० किलो पर्यंत कमी केलेली आहे त्यामुळे आमच्या मनाला खुप वेदना झालेल्या आहेत.
तरी कारखान्याने आपला निर्णय माघारी घेवून गरिब शेतकरी सभासदांना दिवाळी साखर वाटपाचा कोटा ५० किलो पर्यंत करावा अथवा कमीतकमी ३० किलो करावाचा. अन्यथा पुढील आठवडयामध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालया समोर सर्व शेतकरी सभासदांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या शासकीय अडथळ्यास सर्वस्वी कारखाना प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार राहील. यावेळी मागण्यांचे निवेदन कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे व सचिव कालिदास निकम यांना देण्यात आले. यावेळी शरद ननवरे, राजन पवार, केशव बंडगर आदी सभासद उपस्थित होते.
COMMENTS