सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव ; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली येथे सागर जाधव यांच्या दूध दरवाढी संदर्भात सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र शासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्याने आज दुपारी संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्र आले होते. या बैठकीत विद्युत रोषणाई व दिव्यां व्यक्तीरीत काळी दिवाळी साजरी करण्याचा निश्चित केलेला आहे. दरम्यान उद्या या आंदोलनाला पाठिंबा देत कोऱ्हाळे ग्रामस्थांचा रास्तारोको व रॅली आयोजित केली आहे.
तरडोली ता. बारामती येथील युवा शेतकरी सागर पंडित जाधव यांनी दुधास 42 रुपये हमीभावा सहीत इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. आज या आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून आज साखळी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी येथील इतर शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच येथील ग्रामस्थ एकत्र येऊन गावांमध्ये प्रत्येकाने घराच्या समोर दिवे न लावता दिव्या विरहित व फटाक्यांवरही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सागर जाधव यांनी दुधास दरवाढ मिळण्यासाठी सुरु केलेल्या उपोषणास आज पुरंदर , बारामती , इंदापुर तालुक्यातून शेतकरी आले होते. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी काळी दिवाळी करण्याचा निर्णय गावातील जेष्ठ नागरीकांसहीत तरुणवर्गाने घेतला.आज दूध संघर्ष अभियान समितीचे सतीश देशमुख शेती तज्ञ , दत्तात्रय कड, महेश जेधे, खंडु कडके आदींनी भेट दिली. दरम्यान काल बारामती तहसीलदार गणेश शिंदे तर आज सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी आज या उपोषण स्थळी भेट देऊन या मागण्या शासनापर्यंत पुरवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील युवकांचा तसेच परिसरातील पुरंदर, बारामती ,इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी दिनांक १२ रोजी तालुक्यातील कोऱ्हाळे येथुन मोटासायकल रॅली उपोषण स्थळापर्यंत काढण्यात येणार आहे.
COMMENTS