सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिसांनी मागील दोन दिवसात मोठी कारवाई करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हे चोर ताब्यात घेतल्या पासून नीरा शहरात कोण ? सापडला रे कोण... ? अशा चर्चा नीरा शहरात जोरदार सुरू आहे. पोलिसांची गुप्त कारवाई सुरू असल्याने व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलीस अजूनही याबाबत माध्यमांना काही सांगत नाहीत.मात्र मागील दोन दिवसा पासून पोलिसांनी नीरा येथील काही लोकांना ताब्यात घेतले असून.त्यांच्याकडून काही दुचाकींची रिकव्हरी देखील केली आहे.मात्र याबाबत लोकांना काहीच कळत नसल्याने नक्की पोलिसांनी पकडलेला चोर कोण? या बाबत नीरा परिसरात सध्या दबक्या आवाजात चर्चेला ऊत आला आहे.
नीरा (ता.पुरंदर) येथे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यातच मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये नीरा आणि परिसरातून एकूण ३५ पेक्षा जास्त मोटरसायकल चोरी झाल्या होत्या. या संदर्भात काही लोकांनी तक्रार केली होती. तर काही लोकांनी तक्रार दिली नाही.मात्र आता चोर सापडले असे समजल्याने अनेकांना आपली गाडी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. तक्रारदारांपैकी काही लोकांनी थेट जेजुरी पोलीस स्टेशन गाठले. मात्र तपास सुरू असल्याने व त्यांची गाडी मिळून नआल्याने त्यांना हात हलवत माघारी यावं लागलं आहे. मात्र तरी देखील जास्त गाड्या या पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे या गाड्या चोरणारा चोर नक्की कोण? याबाबत नीरा परिसरात आता उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. काही प्रतिष्ठित लोक या चोरीच्या घटनांच्या पाठीमागे असल्याची चर्चा सध्या नीरा शहरात सुरू आहे.
मागील काही दिवसापूर्वी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये नवीन अधिकारी रुजू झाले. जुने अधिकारी गेले आणि यानंतर निरा परिसरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्याची मोठी जबाबदारी या नव्या अधिकाऱ्यांवर आली होती. यातूनच नव्या अधिकाऱ्यांनी या चोरीचा मागवा घेत काही चोरांना जेरबंद केला आहे. त्यातच त्या चोरांकडून मोटरसायकल घेऊन वापरनाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.या चोरीच्या प्रमाणात आपण गुंततो की काय? अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
आता आवैध सावकरीचा पाश पोलीस आवळणार का ?
जेजुरी पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकारी रुजू झाल्यानंतर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. त्याच अनुषंगाने नीरा परिसरात अवैध सावकारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही लोक मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावावर अवैध सावकारी नीरा येथे करत आहेत. महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीचे पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाठ वसुली देखील केली जाते आहे. मायक्रो फायनान्स कंपनीला सहकार्य करणारे काही एजंट नीरा आणि परिसरामध्ये आहेत. हे एजंट या मायक्रोफायनान्स कंपनीसाठी ग्राहक शोधत असतात. यानंतर वसुलीला देखील मदत करत असतात. मायक्रोफायनान्स कंपन्यांचे दहशत, सावकाराची दहशत,कागदपत्रावर केलेल्या सह्या यामुळे सर्वसामान्य कर्जदाराचे काही चालत नाही. त्याचबरोबर असे एजंट एखाद्या कर्जदाराला आवश्यक असलेल्या रकमेपेक्षा रक्कम त्या कर्जदाराच्या नावावर उचलतात आणि त्यानंतर ही रक्कम दहा टक्के पंधरा टक्के व्याजदराने लावली जाते. असे कर्जजर भरले गेले नाही तर मग मात्र ज्याच्या नावावर कर्ज घेतले आहे, त्याच्यावर ते भरण्याची वेळ येते. अशावेळी पोलिसही काही मदत करू शकत नाहीत. मागील काळात बजाज फायनान्स कंपनीत देखील अशीच बोगस प्रकरणे लोकांच्या नावावर करण्यात आली होती .यानंतर कंपनीने अशा एजंटवर कारवाई करत त्यांचं लायसन रद्द केलं होतं. नीरा परिसरात अनेक महिला सावकारी करत असून त्या महिलांना कर्ज देतात आणि त्यानंतर त्या महिलांचं शोषण केलं जातं. कर्ज दिले गेले नाही तर त्यांना वाम मार्गाला देखील लावलं जातं. याकडे सुद्धा पोलिसांनी लक्ष देणे गरज असल्याची मागणी आता नागरिकांकडून होते आहे.
COMMENTS