बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये ऑनलाईन चक्री जुगार : तीन जणांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे ऑनलाईन चक्री जुगार प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याबाबत अमोल निवृत्ती भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत कैलास शेलार वय 32 वर्षे, प्रशांत  दिपक साळवे वय 22 वर्षे, रितेश सोमनाथ गायकवाड वय 18 वर्षे सर्व रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      दि. १० रोजी वडगाव निंबाळकर ता. बारामती गावच्या हद्दीत उमाजी नाईक चैकात रस्त्याच्याकडेला असलेल्या वैभव हाँटेलचे शेजारी असणारे गाळयामध्ये एक वाँल टेच कंपनीचा एल ई डी, लीनोव्हो कंपनीचा सी पी यु, एक की बोर्ड, बेकायदा, बिगरपरवाना    एक संगणक  व वरील मुद्देमाल  बाळगलेले स्थितीत मिळुन आले त्या  संगणकाची पाहणी केली असता त्यामध्ये १ ते १० असे आकडे व चक्री फिरत असलेली दिसुन आली. पुढील तपास  ए एस आय फणसे हे करीत आहेत .
To Top