Baramati News ! दिवाळीनिमित्त मोफत कपड्यांचे वाटप : लोणी-भापकर येथील विलास भापकर मित्रमंडळाचा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
लोणी-भापकर ता. बारामती येथील साठ कुटुंबातील  गोरगरीब तरुण, वृध्द पुरुष, अपंग, विधवा, परितक्ता महिलांना विलास भापकर मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त मोफत कपडे वाटप करण्यात आले.        
            यावेळी बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर, माजी सरपंच विजय बारवकर, माजी उपसरपंच ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते विलास भापकर, गोविंद भापकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर, अविनाश बनसोडे, तरडोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान धायगुडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिलीप जगदाळे, पोलीस पाटील संजय गोलांडे यांच्यासह किरण भापकर, गजानन भापकर, गंगाराम मदने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वयंभू नगर सोसायटीचे चेअरमन विजय गोलांडे यांनी केले.
To Top