सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मागील आठ दिवसांत वाढदिवसासाठी भोर शहरातील एका मिठाई दुकानामधून ( स्वीट मार्ट) केक व लाडू खानापूर ता.भोर येथील सेवानिवृत्त पोलिस अंकुश गणपत साळवी वय -६३ यांनी खरेदी केले होते.मित्रांसोबत केक कापून दोघांनी केक व लाडू सेवन केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी दोघांना उलट्या झाल्या.तात्काळ केक व लाडू खाणाऱ्या व्यक्तींनी भोर येथे शासकीय रुग्णालयात येऊन उपचार घेतले.यावेळी बुरशीयुक्त लाडू व केक खाल्ल्याने उलट्या झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संबंधित दुकानदारावर दोन दिवसात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होणार असल्याची चर्चा भोर शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
अनेक दिवसांचा असलेला केक व लाडू यांना बुरशी लागून वास येत होता.खरेदी केलेला लाडू व केक पुन्हा संबंधित मिठाई दुकानदाराला दाखवण्यासाठी परत आणले असता तुम्हाला केकचे पैसे देतो व लाडूही बदलून देतो असे दुकानदारांकडून सांगण्यात आले.तर लाडू परत दिले नाहीत.यावेळी भोर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी अंकुश साळवी गेले होते.भोर पोलिसात या विषयाची तक्रार घेतली नाही.मात्र तुम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करा असे सांगण्यात आले.अन्न व औषध प्रशासन विभागाकडे ऑनलाईन तक्रार अर्ज करून आठ दिवस उलटले तरी संबंधित मिठाई विक्रेत्या दुकानदारावर कारवाई करण्यात आलेली नाही असे विषबाधा झालेले अंकुश साळवी यांनी सांगितले.
----------------------
चार दिवसात कारवाई करू-------
भोर तालुक्यातील ऑनलाईन तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासनाकडून प्रोसेस सुरू आहे खात्रीशीर माहिती घेवून पुढील चार ते पाच दिवसात मिठाई दुकानदारावर कारवाई करणार असल्याचे अन्न व औषधी विभागाचे अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी सांगितले.
COMMENTS