सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी बारामती तालुका अध्यक्षपदी मुरूम गावचे सुपुत्र व सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक तथा शासन नियुक्त संचालक प्रकाश किसनराव जगताप (पी.के.) यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती पत्राचे वितरण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष व पुणे ग्रामीणचे प्रभारी राजेश पांडे व पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे बारामती विधानसभा निवडणूक प्रमुख माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन रंजन तावरे, अविनाश मोटे मा.सरचिटणीस पुणे जिल्हा भाजप सतीश फाळके उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप, शामराव कोकरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप हे उपस्थित होते.