सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
ऊसशेती परवडत नाही..असे बोलले जाते पण योग्य नियोजन, कष्ट आणि जिद्द असेल तर काहीही अवघड नसते.हे बारामती तालुक्यातील पणदरे गावातील संजय जगताप या शेतकऱ्याने ! कोईमतुर ८६०३२ ऊसाच्या एक एकर क्षेत्रातुन तब्बल १३८ मेट्रिक टनाचे उत्पादन घेतले आहे.
दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे घटणारे उत्पादन आणि न परवडणारी ऊस शेती असे म्हटले जाते,तथापि योग्य नियोजन जिद्द,चिकाटी व मेहनत याच्या जोरावर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पणदरे, सोनकसवाडी (ता.बारामती) येथील ऊस उत्पादक शेतकरी संजय यशवंत जगताप यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात तब्बल १३८ मेट्रिक टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
या विक्रमी घेतलेल्या उत्पादनाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. याबाबत संजय जगताप म्हणाले,उसाची लागण केलेल्या क्षेत्रात आगोदर केळी लावली होती,केळी मोडून सात फुटी पट्टा पद्धतीने उसाच्या प्रत्येक रोपांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेऊन को.एम. ८६०३२ या उसाच्या जातीच्या रोपांची अडसाली लागण केली होती.सदर उसाची बाळबांधणी,तगारणी यासाठी धोरण निश्चित केले होते.तर उस १०-१२ तसेच २०-२२ कांड्यावर आल्यावर वेळोवेळी पाचट काढले.तर प्रत्येक ऊस हा ४२ ते ४८ कांड्याचा दरम्यान होता.पाटाने पाणी न देता ठिबक संचाच्या साह्याने रासायनिक खते देऊन संपूर्ण क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये ऊस उत्पादन घेतले आहे.याकामी माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे जगताप यांनी सांगितले.कारखान्याचे अध्यक्ष ॲड.केशवाबापू जगताप,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे,उपाध्यक्ष तानाजी देवकाते,सर्व संचालक,कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींनी जगताप यांचे कौतुक केले.
-----------------
धीरज संजय जगताप
मु पो. पणदरे ता. बारामती जि. पुणे
संपर्क : +919657245550