सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दि 12 रोजी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
नीरा शिवतक्रार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर जेष्ठ नेते शरद पवार हे ग्रामस्थांच्या भेटीसाठी रविवार दि 12 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय नीरा येथे सकाळी दहा वाजता येणार आहेत. वास्तविक दरवर्षी पवार कुटुंबीयांची दिवाळी बारामतीत एकत्रितपणे साजरी केली जाते यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी या दिवशी जत्रेचे स्वरूप आलेले असते. यामधून वेळ काढून जिल्हा परिषद व बांधकाम आरोग्याचे माजी सभापती दत्ता चव्हाण व निरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन शरद पवार नीरेमध्ये येत आहेत