बारामती ! मुलींच्या विभागीय कुस्ती स्पर्धेत अहमदनगर विभागाला विजेतेपद : पुणेला सांघिक उपविजेतेपद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे                         महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या कुस्ती स्पर्धा बुधवार दि. ८ रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पुणे जिल्हा, अहमदनगर व नाशिक या चार विभागातून १९ वजन गटामध्ये ७० मुलींनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद अहमदनगर विभागाने मिळविले, पुणे जिल्ह्याला सांघिक उपविजेतेपद मिळाले. 

          या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाचे आधिकारी शिवाजी उत्तेकर यांच्या शुभहस्ते पार पडले, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समिती सदस्या सुजाता भोईटे, पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सहसचिव गौतम जाधव, उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप उपस्थित होते. प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना विद्यापीठ स्तरावर खेळाडूंना मोठया प्रमाणावर क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर स्पर्धा या पारदर्शक वातावरणामध्ये पार पडतील. निवड झालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी जास्तीत जास्त पदके मिळवावे असे आवाहन  करून, महाराष्ट्राच्या मुलींनी ऑलिंपिक मध्ये पदक मिळवावे, व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये उंचवावे असे आवाहन केले .
                  या स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहित आमले, राष्ट्रीय कुस्ती पंच रवी बोत्रे व त्यांचे सहकारी यांनी यशस्वी पणे कुठलीही तक्रार न होता पारदर्शकपणे पार पाडल्या. संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर महाविद्यालयीन नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना महाविद्यालया तर्फे सर्व खेळाडू ,पंच, प्रशिक्षक यांना स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
         प्रा. बाळासाहेब मरगजे , प्रा. दत्तराज जगताप , प्रा.डाॅ. श्रीकांत घाडगे, कर्मचारी आदित्य लकडे यांनी या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
To Top