सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची असलेली सत्ता भाजपने यावेळी खेचुन आणली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे कल्याण राजपुरे यांचा पराभव भाजपचे अशोक भगवान खैरे यांनी ५१ मतांनी केला.
राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्यावतीने कल्यान राजपुरे तर भाजपचे दिलीप खैरे आणि पोपट खैरे यांच्यावतीने अशोक खैरे सरपंचपदाला निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र या चुरशीच्या लढतीत अशोक खैरे यांना ७५१ मते मिळाली तर राजपुरे यांना ७०० मते मिळाल्याने खैरे ५१ मताने विजयी झाले.
या ग्रामपंचायतीत भाजपचे सरपंच आणि चार सदस्य तर राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडुन आले. यावेळी निवडुन आलेले सदस्य पुढील प्रमाणे भाजपचे वार्ड एक व तीन मधुन भाग्यश्री चांदगुडे, तुषार चांदगुडे, विनोद सस्ते, वृषाली खैरे विजयी झाल्या. तर राष्ट्रवादीचे वार्ड एक, दोन आणि तीन मधुन प्रकाश चांदगुडे, धिरज भोंडवे, दिपाली शिवतारे, छाया खैरे आणि संगिता खैरे विजयी झाल्या. यावेळी धिरज भोंडवे आणि भगवान शिवतारे यांना २०२ अशी समान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठी टाकुन धिरज भोंडवे विजयी झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र चांदगुडे, सहाय्यक देविदास लडकत यांनी दिली.
...................................
COMMENTS