सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : दीपक जाधव
काळखैरेवाडीच्या पंचवार्षिक निवडणूकीत बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल भोंडवे व समस्त ग्रामस्थ काळखैरेवाडी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनसेवा ग्रामविकास पॅनेल व जनसेवा परिवर्तन पॅनेल यांच्या मध्ये सरळ लढत होवुन नम्रता कुतवळ सरपंचपदाची बाजी मारली. कुतवळ यांनी २४४ ही अधिकची मते घेवुन शितल भोंडवे यांचा पराभव केला.
यामध्ये विशाल भोंडवे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. त्यांचे सरपंच पदासह ८ ग्रा.पं. सदस्य निवडून आले तर विरोधी पॅनेलचा एक सदस्य निवडुन आला. निवडुन आलेले सदस्य पुढील प्रमाणे वॉर्ड १ बाळासाहेब रघुनाथ भोसले २७८, अंकिता संदिप भोंडवे २९६, संगीता सुरेश भोंडवे 283, वॉर्ड 2 मध्ये प्रशांत मंगेश खैरे २५९, स्वाती सचिन भोंडवे २९३, कोमल विजय कुतवळ ३१० वॉर्ड, अजित गोरख काळखैरे २६०, संगिता सचिन काळखैरे २४४ तर विरोधी गटाचा एक उमेदवार प्रकाश सुर्यकांत काळखैरे निवडुन आले. तर सचिन छगन शेंडगे यांचा मात्र निसटता पराभव झाला.
दरम्यान मतदारांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू व विशाल भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास चालू ठेऊ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच नम्रता कुतवळ यांनी दिली.
...............................