सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर - प्रतिनिधी
तब्बल २० वर्षांनी ते एकत्र आले. त्याच खोड्या, तीच मस्ती, तीच मैत्री अशा प्रकारे वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला.
सन २००३ - ०४ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत एकत्र यायचे ठरवले. ठरलेल्या वेळेत ते नियोजित अक्षय गार्डन या ठिकाणी पोहोचले आणि पुन्हा सुरू झाली गप्पांची मैफिल. काही जण एकमेकांच्या संपर्कात होते तर काही मात्र खूप वर्षांनी एकमेकांना भेटत होते. एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
या सर्व जुन्या जिवाभावाच्या वर्ग मित्रांना एकत्र आणण्यात डॉ प्रवीण जगताप व मयूर जाधव यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी राहूल खोमणे, नवनाथ पुंडेकर, विकास हिरवे, सर्फराज मुजावर, पवन जगताप, समीर आत्तार, तानाजी जाधव, इंद्रजित साळवे, विजय शिंदे,राहुल बोबडे, सागर जाधव, मंगेश खोमणे, विजय बरकडे, सुशांत नेवसे, विजय बरकडे, केशव बनकर, संदीप बनकर हे विद्यार्थी तर अनुराधा नरगे,सोनाली राऊत, वृषाली गायकवाड, सुप्रिया चव्हाण, प्रगती साळुंखे, आरती सूर्यवंशी, दीपा खोपडे,शुभांगी शितोळे, विमल राऊत, अश्विनी शिंदे या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. रोजच्या धकाधकीच्या जीवनात जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून वेगळी ऊर्जा व समाधान मिळाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS