भोर ! आंबेघरला निरा नदीच्या बंधाऱ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबेघर ता.भोर येथील निरा नदी पात्राच्या बंधाऱ्यात सोमवार दि.२० पाण्यावर तरंगताना अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. याची खबर भोर पोलिसात आंबेघर पोलीस पाटील दशरथ गिऱ्हे यांनी दिली.
     भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेघर येथील नीरा नदी पात्राच्या बंधाऱ्यातून पाण्यावर तरंगत असणारा एक पुरुष जातीचा मृतदेह वाहत चालला होता.याची माहिती स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी भोर पोलिसांना दिली.तात्काळ भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिसावरे गावच्या स्मशानभूमी जवळ मृतदेह पाण्यात वाहत जाणारा अडवून पाण्याच्या बाहेर काढला. हा मृतदेह अनोळखी असून अंदाजे ४० वयाचा आहे.तर मृतदेहाच्या अंगावर काळपट ग्रे रंगाचा हाफ बाह्यांचा गोल गळ्याचा टी-शर्ट व निळसर रंगाची अंडरवेअर आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार उद्धव गायकवाड करीत आहेत.
                                     
To Top