सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा येथील जुबिलियंट खत प्रकल्पाच्या साईड वरती रात्रपाळीवर काम करणारा युवक विजय भगवान पवार वय 45 रा. लक्ष्मी नगर या युवकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धक्क्याने जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लक्ष्मीनगर येथील विजय पवार हा रात्रपाळीला खत प्रकल्पात काम करीत असताना रात्री अकरा वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीचा मागच्या बाजूला धक्का लागून जखमी झाला. कंपनीच्या ॲम्बुलन्स मध्ये तातडीने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर दुखापत नसल्यामुळे रात्री पुन्हा घरी सोडण्यात आले. मात्र रात्री दोनच्या दरम्यान त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवळी अधिकचा तपास करंजेपुल पोलीस स्टेशन करत आहे.
याबाबत कंपनीशी संपर्क केला असता हा अपघात कंपनी गेट च्या आत झाला नसून कंपनी गेट च्या बाहेर झाला आहे. संबंधित अपघातग्रस्ताला कंपनीच्या ॲम्बुलन्सने दवाखान्यात ऍडमिट केले असल्याचे सांगितले.
COMMENTS