सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली व मतमोजणीनंतर गावातील दोन्ही गटांमध्ये विजय मिरवणुकीवरून किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता.
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जवळपास 35 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता सुरुवातीला जामीन पात्र गुन्हा होता परंतु नंतर काही साक्षीदारांची जबाब नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केला व सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपीच्या वतीने आरोपीचे फौजदारीचे प्रसिद्ध वकील एडवोकेट राजेंद्र काळे व रंजीत गावडे यांनी जोरदार युक्तिवाद करून आरोपीची अटक ही बेकायदेशीर आहे.
त्यांना कलम 41 प्रमाणे नोटीस दिलेली नाही आणि त्यामुळे आरोपींना बेकायदेशीरपणे अटक केलेले आहे यावरती भर दिल्यामुळे न्यायालयाने आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद व तसेच पोलिसांच्या तपासामध्ये व अटके मध्ये झालेला हारगर्जीपणा नोटीस न देणे जामीन पात्र गुन्ह्यांमध्ये अटक करून ताब्यात ठेवणे व त्यानंतर जबाब नोंदवून वाढीव कलम लावणे व जे आरोपी जखमी आहेत त्यांच्याच विरुद्ध वाढीव कलमाचा उपयोग करणे या सर्व गंभीर बाबींचा गांभीर्याने विचार करून सर्व आरोपींना पहिल्याच दिवशी जामीनावर मुक्त केले.
COMMENTS