सोमेश्वर रिपोर्टर टीम.........
निरा : विजय लकडे
खंडोबाचीवाडी ता. बारामती येथील सौदामिनी महिला बचत गटाच्या वतीने दिवाळी सणासाठी महिला सदस्यांना दिवाळीचा बाजार बोनस रूपाने वितरित करण्यात आला.
यामध्ये महिलांना एक जेमिनी सूर्यफूल तेल डबा, पाच किलो डाळ, दोन किलो खोबरे , तीन किलो रवा, तीन किलो मैदा अशा वस्तूचे वाटप करण्यात आले. १६ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या बचत गटामार्फत गेली ५ वर्ष हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. यामुळे या उपक्रमाचे कौतुक खंडोबाचीवाडी व परिसरात कौतुक होत आहे या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आर्थिक रित्या सक्षम बनून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहे.
महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुशीला लोखंडे व इतर सर्व महिला सदस्यांच्या उपस्थिती मध्ये या वस्तूचे वाटप करण्यात आले असून येणाऱ्या दिवाळी सणासाठी अध्यक्षा सुशीला लोखंडे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.