पुरंदर ! गुळूंचे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सभापती अजित निगडे यांच्या पॅनेलची एकहाती सत्ता : विरोधी पॅनलचा ९-१ ने धुव्वा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष वेधलेल्या गुळूंचे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी ज्योतिर्लिंग ग्रामविकास  पॅनलच्या सरपंच पदासाठीच्या उमेदवार सौ.सम्राज्ञी कौस्तुभ निगडे यांनी ग्रामसमृद्धी पॅनलच्या सौ. निर्मला उत्तमराव निगडे यांचा पराभव केला. 
वार्ड क्रमांक एक मधील विजयी उमेदवार 
१) निगडे दीपक आनंदराव- सर्वसाधारण पुरुष  २)कर्णवर शीतल शेखर- ना.मा. प्रवर्ग ३)  निगडे हेमलता हनुमंत- सर्वसाधारण स्त्री. 
वार्ड क्रमांक दोन
१) निगडे तानाजी बजाबा -सर्वसाधारण पुरुष
 २) निगडे कविता शंकर- सर्वसाधारण स्त्री.
३) पाटोळे ज्ञानेश्वर शंकर- अनुसूचित जाती
 वार्ड क्रमांक तीन 
१)निगडे आरती भगीरथ सर्वसाधारण स्त्री.
२) फरांदे वैशाली राजेंद्र ना .मा. प्रवर्ग 
विरोधी ग्रामसमृद्धी पॅनलला  केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या पॅनलच्या उमेदवाराला फक्त दोन मतांनी  निसटता  विजय मिळाला. गुळूंचे पंचक्रोशीतील ही एक संवेदनशील ग्रामपंचायत असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सभापती व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अजित निगडे यांनी केले. नारायण निगडे, काका निगडे, माजी सरपंच संतोष निगडे यांची साथ मिळाली.  विरोधी ग्रामसमृद्धी पॅनलचे नेतृत्व सुरेश जगताप यांनी केले. ही निवडणूक महिलामागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची ही पावतीच असल्याचे मत सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांनी व्यक्त केले.
---------------------
गुळूंचे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी सभापती अजित निगडे यांचा बालेकिल्ला असलेल्या वार्ड क्रमांक तीन मध्ये नितीन निगडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणले आहे. आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक नितीन निगडे व कांचन निगडे यांच्या भाऊजय अमृता निगडे या वार्ड मधून विजयी झाले आहेत.
To Top